Gold
देश बातमी

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

नवी दिल्ली :गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहिला मिळत आहे. त्यानंतर आता सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. सोन्याच्या दरात 0.86 टक्क्यांची घट झाली. त्यानुसार सोने 447 रुपयांनी कमी झाले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

Gold Price Forecast: XAU Bounces From Support, Gold Bulls on Return?

सध्या सोने प्रतितोळा 51,327 रुपयांवर गेले आहे. तर चांदीच्या दरातही घसरण झाल्याचे पाहिला मिळाले. स्थानिक बाजारात आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी चांदीच्या वायदा किंमतीत मोठी घट झाली. एमसीएक्सवर चांदीचा भाव शुक्रवारी सकाळी 1.58 टक्के म्हणजे 1091 रुपयांनी घसरला. सध्या चांदीचा दर प्रतिकिलो 67,900 रुपये झाला आहे.

दरम्यान, सोन्याच्या दरात आज सुरूवातीला किरकोळ घट झाली. प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 49,450 रुपयांवर गेला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत