कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी करणार महत्त्वाची चर्चा
देश बातमी

कोरोना प्रतिबंधक लस विकसित करणाऱ्या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी करणार महत्त्वाची चर्चा

नवी दिल्ली : देशातील कोरोना साथीचा दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत असलेल्या तीन कंपन्यातील टीम सोबत चर्चा करणार आहेत. कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीत प्रगती पथावर असलेल्या जीनोव्हा बायोफार्मा, बायोलॉजिकल ई आणि डॉ. रेड्डी या तीन टीम्ससोबत पंतप्रधान मोदी चर्चा करतील, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या टि्वटमध्ये दिली आहे. आज ३० नोव्हेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करतील.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पीएमओच्या टि्वटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ”पंतप्रधान मोदींनी शनिवारीच अहमदाबादच्या झायडस पार्क, हैदराबादच्या भारत बायोटेक आणि पुण्याच्या सिरम इन्स्टि्टयूटला भेट दिली. प्रत्यक्ष तिथे जाऊन लस निर्मितीच्या कार्याचा आढावा घेतला. त्यानंतर आज मोदी तीन टीम्स सोबत चर्चा करणार आहेत.” असे या ट्वीट म्हंटले आहे.

दरम्यान, पंतप्रधानांनी शनिवारी (ता. २८) पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटला भेट दिल्यानंतर सध्या सर्वांचच लक्ष सिरम इन्स्टीट्यूटकडे लागलं आहे. . सिरम ही जगातील सर्वात मोठी लस निर्मिती करणारी कंपनी आहे.ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकाने विकसित केलेल्या करोना प्रतिबंधक लशीची निर्मिती सिरम इन्स्टीट्यूट करत आहे. पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींनी सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली.

पंतप्रधानांनी सिरम इन्स्टीट्यूटमधील वैज्ञानिक आणि अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी तासभर चर्चा केली. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यावेळी पूनावाल कुटुंबीय तिथे उपस्थित होते मोदींनी यावेळी करोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.