ajit pawar
बातमी महाराष्ट्र

अजित पवारांच्या अडचणींत वाढ होणार?; कारण…

मुंबई : महाराष्ट्रातील सिंचन घोटाळा प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. आता त्याचं कारण आहे सक्तवसुली संचालनालयाने (ED) जलसंपदा विभागाला पाठवलेली एक नोटीस. त्यामुळे पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोकणातील सिंचन प्रकल्पांची ईडी विभागाने माहिती मागितली आहे. येत्या 21 ऑक्टोबरला काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीला हजर राहण्याबाबत जलसंपदा विभागातील वरिष्ठ अधिकारी यांना समन्स बजावले आहे. जलसंपदा विभागाकडे 2009 पासून वाढीव प्रकल्प खर्च मान्यता, टेंडर, आर्थिक व्यवहार यांची माहिती ईडीने मागितली आहे. या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची चौकशीही केली जाणार आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांच्यासह इतरांना लाचलुचपत प्रतिबंधक (ACB) विभागाने क्लिन चिट दिली होती. तसेच मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना राज्य सहकारी बँक प्रकरणातही क्लिन चिट दिली होती. याबाबतचे वृत्त एका मराठी वाहिनीच्या वेबसाईटवर देण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत