देश बातमी

चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; धक्कादायक माहितीचा उलगडा

नवी दिल्ली : नव्या कृषी कायद्यांवरून दिल्लीत शेतकरी आक्रमक झाले आहेत. अशात एक धक्कादायक बातमी समोर आली असून चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल्याचं समोर आलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांकडून प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीची तयारी सुरू असताना हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीने हत्येच्या कटाची कबूलीही दिली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शुक्रवारी रात्री आंदोलक शेतकऱ्यांनी एका चेहरा झाकलेल्या व्यक्तीला माध्यमांसमोर उभं केलं. त्यानंतर या व्यक्तीनं चार शेतकरी नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला होता. ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी शेतकरी नेत्यांना गोळ्या घालण्याचा कट होता. शेतकरी नेत्यांनी आरोपीला आंदोलनस्थळी पकडलं. त्यानंतर माध्यमांसमोर त्याला आणण्यात आलं. त्याचा चेहरा झाकलेला होता.

२६ जानेवारी रोजी काढण्यात येणाऱ्या रॅलीत उधळून लावण्यासाठी चार नेत्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आल होता. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी हे केलं जाणार होतं. यासाठी आमच्या टीममधील अर्धे लोक पोलिसांची वेशभूषा करून रॅलीत घुसणार होते. व्यासपीठावर उपस्थित राहणाऱ्या चार नेत्यांचे फोटो आम्हाला देण्यात आले होते. ज्या व्यक्तीनं आम्हाला हे सांगितलं, तो स्वतः पोलीस आहे, अशी खळबळजनक कबुलीही आरोपीनं दिली आहे.

आमचे दोन गट तयार केले होते. १९ जानेवारीपासून आंदोलनस्थळी आहे. शेतकरी सोबत शस्त्र बाळगतात का यांचा शोध घेण्याचं काम दिलं होतं, असं आरोपीनं सांगितलं.२६ जानेवारीला शेतकरी थांबले नाहीत. तर त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश होते. तर दुसरीकडे दहा जणांचा एक गट आहे. हा गट शेतकऱ्यांच्या रॅलीत सहभागी होऊन पाठीमागून गोळीबार करील. जेणेकरून आंदोलक घाबरून पांगतील. त्याचबरोबर व्यासपीठावर जे चार लोक असतील, त्यांना गोळ्या घालण्याचा कट आहे. त्यांचे फोटो देण्यात आलेले आहे. अशी माहिती आरोपीनं दिली आहे.