राज्यात घरोघरी सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा पहिला मान पुण्याला
पुणे बातमी

राज्यात घरोघरी सुरू होणाऱ्या लसीकरण मोहिमेचा पहिला मान पुण्याला

पुणे : राज्यात घरोघरी लसीकरणाची सुरूवात होणार आहे. त्यातील पहिला मान पुण्याला मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेत एक खास संकेतस्थळ तयार करण्यात येणार आहे. त्याद्वारे इच्छुकांचे अर्ज स्विकारले जातील अशी माहिती आज (ता. ३०)राज्य सरकारच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलेला प्रयोग यशस्वी ठरल्यास इतर जिल्ह्यातही राबविण्यात येईल, अशी माहितीही खंडपीठाला देण्यात आली.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी राज्य सरकारच्यावतीने राज्याचे महाधिवक्ता आशितोष कुंभकोणी यांनी बाजू मांडली. ज्येष्ठ नागरिक आणि अंथरूणांवर खिळलेल्या व्यक्तींना घरोघरी जाऊन लस देण्यासंदर्भात राज्य सरकार स्वतः निर्णय घेणार आहे. त्यासाठी ते केंद्राकडे परवानगी मागणार नाहीत. अशी माहिती कुंभकोणी यांनी खंडपीठाला दिली.

त्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर पुण्याची निवड करण्यात आली असून पुणे महापालिकेचा विस्तार आणि लोकसंख्या आणि परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सदर प्रक्रिया याआधीही राबविण्यात आली आहे. त्यामुळे पुणे निवडण्यात आले असून हा प्रयोग यशस्वी ठरला तर तो इतर जिल्ह्यातही राबविण्यात येईल असे राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता कुंभकोणी यांनी खंडपीठाला सांगितले.