ससून रुग्णालयातून पळवले तीन महिन्याच्या बाळाला
पुणे बातमी

ससून रुग्णालयातून पळवले तीन महिन्याच्या बाळाला

पुणे : पुण्यात एका पाठोपाठ एक खळबळजनक घटना घडत असल्याने शहर हादरले आहे. शहरातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेबाबत नागरिकांमधून प्रश्न निर्माण केले जात आहेत. पुणे स्टेशन परिसरातून १४ वर्षीय मुलीला पळवून नेत तिच्यावर बलात्काराच्या घटनेला आठवडा होत नाही, तोच एका रिक्षाचालकाने सहा वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराची केल्याची संतापजनक घटना घडली होती. या दोन्ही घटनांनंतर एका नर्सच्या वेशेतील महिलेने तीन महिन्यांच्या चिमुकलीला ससून रूग्णलायतून पळवून नेल्याची घटना घडली आहे. मात्र, अवघ्या काही तासांत पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले आणि त्या चिमुकलीची त्या महिलेच्या तावडीतून सुटका करत, तिच्या आईकडे सोपवले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

आरोपी महिला उच्चशिक्षित असून तिला अनेक वर्षापासून मूल होत नव्हते. यातून तिने मुलीला पळवून नेल्याची माहिती समोर आली आहे. वंदना जेठे (रा. खराडी) असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ससून रुग्णालयात काल दुपारी कासेवाडी भागात राहणारी एक महिला तिच्या तीन महिन्याच्या मुलीसह एका मैत्रिणीसोबत आली होती. तेव्हा त्या महिलेसोबत असलेली मैत्रीण काही कामानिमित्त बाहेर गेली. त्यानंतर काही मिनिटांनी आरोपी वंदना ही नर्सच्या वेशात त्या महिलेकडे गेली आणि म्हणाली की, तुम्हाला बाहेर त्यांनी बोलावले आहे, मी बाळाला सांभाळते. नर्स असल्याने त्या महिलेने विश्वासाने मुलीला आरोपी महिलेकडे दिले.

काही मिनिटांनी त्या मुलीची आई ज्या महिलेकडे आपण मुलीला दिले. तिथे परत आली असता ती आरोपी महिला कुठेही दिसत नव्हती. यावतर तत्काळ तेथील सुरक्षारक्षक आणि पोलिसांना माहिती दिली गेली. त्यानंतर सीसीटीव्हीत तपासणी केली गेली. त्यामध्ये आरोपी महिला रुग्णालयाच्या बाहेरील एका रिक्षात मुलीला घेऊन बसताना दिसली. त्यानं आरोपी वंदना हिला चंदननगर येथून अथक प्रयत्नानंतर ताब्यात घेण्यात आले.