पुणे : राज्यातील इतर शहरांमध्ये २०१९ पूर्वी नोंदणी असलेल्या गाड्यांना ‘उच्चसुरक्षा नंबरप्लेट’ (एचएसआरपी) पुण्यातच बसवून मिळणार आहे. नागरिकांनी या सुरक्षा नंबरप्लेटसाठी नोंदणी करताना पुणे शहरातील केंद्र निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे दुसऱ्या शहरांमध्ये नोंदणी असलेल्या आणि पुण्यात वापरात असलेल्यांना वाहनमालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा
देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना एक एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना ‘सुरक्षा नंबरप्लेट’ देणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार नवीन वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट लावल्या जातात. मात्र, २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनादेखील परिवहन विभागाने सुरक्षा नंबरप्लेट बसवणे बंधनकारक केले आहे.
पुण्यात २५ लाख वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. आतापर्यंत एक लाख ४२ हजार वाहनांनी सुरक्षा नंबरप्लेटसाठी अर्ज केले आहेत; पण आतापर्यंत फक्त ३२ हजार वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यात आल्याचे पुणे ‘आरटीओ’ने कंपनीला पत्र पाठवून विविध सूचना केल्या आहेत.
‘फीटमेंट’चे काम संथगतीने
पुण्यात सुरक्षा नंबरप्लेट बसवाव्या लागणाऱ्या गाड्यांची संख्या २५ लाख आहे. सध्या पुण्यात नवी नंबरप्लेट बसवून देण्यासाठी १२५ केंद्रे कार्यरत आहेत. ती वाहन संख्येच्या दृष्टीने पुरेशी नाहीत. त्यामुळे नंबरप्लेट बसविण्यासाठी खूप वेळ लागत आहे.