पुणे बातमी

मंत्रिमंडळ उपसमितीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पाहणी – आयुक्त नारनवरे

गाझियाबाद : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या इंदू मिलमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या कामाला पुन्हा एकदा गती येताना पाहायला मिळत आहे. ही गती देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. याच उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळ्याची पाहणी केली आहे. काही सूचनाही या उपसमितीने सुचवलेल्या आहेत. जगभरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापैकी सर्वाधिक उंच हा पुतळा असणार आहे असे मंत्रीमंडळ उपसमिती सदस्य तथा महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी म्हटले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जगभरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापैकी सर्वाधिक उंच हा पुतळा इंदू मिलमधील स्मारकात असणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने गाझियाबादमध्ये तयार होत असलेल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याची पाहणी केली आहे त्या वेळी समाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री  धनंजय मुंडे शालेय शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड सामाजिक न्याय विभागाचे सचिव  सुमंत भांगे, समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे सह सचिव दिनेश डिंगळे उपस्थित होते.