पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; लस निर्मीती आणि उत्पादन प्रक्रीयेचा घेतला आढावा
पुणे महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी पुण्यात दाखल; लस निर्मीती आणि उत्पादन प्रक्रीयेचा घेतला आढावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज वायुसेनेच्या विमानाने लोहगाव विमानतळावर आगमन झाले. सिरमचे सीईओ अदर पूनावाला यांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पंतप्रधान मोदी सिरममध्ये दाखल झाल्यानंतर सीईओ अदर पूनावाला यांनी मोदींना सिरमची कार्यपद्धती समजावून सांगितली. मोदींनी यावेळी कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेतला.

अदर पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत ४ कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. भारतात ‘कोविशिल्ड’ असे ऑक्सफर्डने विकसित केलेल्या या लशीचे नाव आहे. ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे.

तत्पूर्वी मोदींनी अहमदाबाद आणि हैदराबादमधील व्हॅक्सिन प्लांटचा दौरा केला. हैदराबादमध्ये, मोदींनी चाचणीच्या यशस्वीतेसाठी ‘कोवाक्सिन’ ही देशी लस तयार करणार्‍या कंपनी भारत बायोटेकच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.. मोदी म्हणाले- लसीचे काम वेगवान करण्यासाठी त्यांची टीम आयसीएमआर बरोबर काम करत आहे.