लवकरच समाज कल्याण विभागाला केंद्र सरकारकडून निधी मिळणार – आयुक्त प्रशांत नारनवरे
पुणे बातमी

लवकरच समाज कल्याण विभागाला केंद्र सरकारकडून निधी मिळणार – आयुक्त प्रशांत नारनवरे

नवी दिल्ली : येथे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थित महाराष्ट्रातील महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागासोबत इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्रातील प्रलंबित विषयावर या बैठकीत चर्चा झाली तसेच केंद्र सरकारकडून निधी देण्याविषयी चर्चा झाली. या बैठकीत केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी लवकरच समाज कल्याण विभागाला केंद्र सरकारकडून निधी मिळेल, असे आश्वासन दिल्याची माहिती या बैठकीला उपस्थित असलेले सामाजिक न्याय व विशेष विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली. यावेळी सहाय्यक आयुक्त विजयकुमार गायकवाड हेही उपस्थित होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यावेळी बैठकीत आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे चालवण्यात येणाऱ्या काही योजना ह्या केंद्र आणि राज्य सरकार यांनी दिलेल्या अनुदानावर या योजना आहेत जर तो निधी मिळाला तर आशा योजना राज्यात राबिवल्या जाऊ शकतात. तश्या योजनांना केंद्र सरकार तर्फे निधी देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच सफाई कामगारांसाठी महानगरपालिका क्षेत्रामध्ये त्यांना कायमस्वरूपी घरे बांधून देण्याच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांना सहकार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.