उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन
बातमी महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंच्या विनंतीनंतर राज ठाकरे कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना विश्वासात घेतलं होतं. राज्यात लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याने उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर कोरोना परिस्थितीची जाणीव करून देत सरकारला घ्याव्या लागणाऱ्या निर्णयाला सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या फोननंतर राज यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

राज्यात कोरोनानं थैमान घातल्यानंतर सरकारनं लॉकडाउन सदृश्य निर्बंध लागू केले तसेच शुक्रवार संध्याकाळपासून सोमवार सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांनी विविध उद्योजकांसह विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केली. रविवारीही मुख्यमंत्र्यांनी अनेक मान्यवरांशी संवाद साधला. त्याचबरोबर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून घेण्यात येणाऱ्या निर्णयाआधी विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुपारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत मनसेनं सहकार्य करण्याची विनंती केली. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.

महाराष्ट्रातील करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत लॉकडाउनचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना फोनवरून केलेल्या संवादात केलं. आपण सर्वांनी सरकारी सूचनाचं पालन करावं. सरकारी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करावं, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेना करत आहे, असं ट्वीट मनसेनं केलं आहे.