अन् राज ठाकरेंनी पुण्यात वापरला मास्क, कारण…
पुणे बातमी

अन् राज ठाकरेंनी पुण्यात वापरला मास्क, कारण…

पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्याला अपवाद ठरले आहेत. राज ठाकरे यांनी आपण मास्क वापरणार नाही, हे जाहीरपणे स्पष्ट केलं होतं. त्यामुळे अनेक कार्यक्रमात राज ठाकरे हे विनामास्क पाहण्यास मिळाले. पण, आज पुण्यात राज ठाकरे चक्क मास्क लावून पोहोचले होते. राज ठाकरे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी महाराष्ट्र्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांची भेट घेतली. यावेळी राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. बाबासाहेब यांची भेट घेण्यासाठी राज ठाकरे मास्क लावून पोहोचले होते.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि राज ठाकरे यांच्यातला जिव्हाळा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आजच्या भेटीदरम्यान, राज ठाकरे यांनी मास्क लावलेला होता. राज यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते होते. त्यामुळे कोरोनाची परिस्थितीत पाहता खबरदारी म्हणून सर्वांनी मास्क लावूनच बाबासाहेबांच्या घरी एंट्री केली.

दरम्यान, पुणे दौऱ्यावर आल्यानंतर राज ठाकरे यापुढे शाखा अध्यक्षाच्या घरी जेवायला जाणं पसंत करणार आहेत,अशी घोषणाच खुद्द राज ठाकरेंनी केली आहे. आगामी वर्षातील पुणे मनपा निवडणुकीच्या तयारीसाठी राज ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत.