कोरोनानंतर निर्माण झालेल्या समस्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल
देश बातमी

कोरोनानंतर निर्माण झालेल्या समस्यामुळे केंद्रीय शिक्षणमंत्री एम्स रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली : कोरोनानंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एम्सच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला असून त्यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयांकडून अद्याप कुठलेही अपडेट मात्र देण्यात आलेले नाहीत. बारावीच्या परीक्षेसंदर्भातील आजची घोषणाही पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या समस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री निशंक यांनी २१ एप्रिल रोजी ट्वीटद्वारे माहिती दिली होती की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासह ते म्हणाले होते की, जे लोक माझ्या संपर्कात आले त्यांनी कोरोना चाचणी करावी. मंत्रालयाचे काम नेहमीप्रमाणे सुरूच राहिल, असेही त्यांनी म्हटले होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवाला. कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील अनेक जणांना व्याधींनी घेरले आहे. अनेकांना याचा त्रास होत आहे. त्यामुळे पुन्हा रुग्णालयात भरती होण्याची परिस्थिती ओढावली आहे.