देश बातमी

बलात्काराचा घेतला विचित्र बदला; भावांकडून आरोपीच्या बहिणीवर गँगरेप

रीवा : बहिणीवर झालेल्या बलात्काराचा सूड उगवण्यासाठी दोन भावांनी आरोपीच्या अल्पवयीन बहिणीवर बलात्कार केल्याची विचित्र घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

संबंधित घटना मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातील गढ येथील आहे. येथील एका अल्पवयीन मुलीवर एका तरुणाने सात महिन्यांपूर्वी बलात्कार केला होता. ही संतापजनक घटना घडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करत कायदेशीर कारवाई केली होती. संबंधित आरोपी सध्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. या घटनेच्या सात महिन्यांनंतर पीडितेच्या दोन भावांनी आरोपी तरुणाच्या अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार करून विचित्र प्रकारे बदला घेतला आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे.

आरोपीची १६ वर्षीय बहिणी घरात एकटी असताना, दोन सख्खे भाऊ जबरदस्ती करत घरात शिरले. याठिकाणी आरोपींनी पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. तसेच, जीवे मारण्याची धमकी देत दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने दोन्ही भावांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बहिणीवर झालेल्या बलात्काराचा बदला घेण्यासाठी सूड भावनेनं आरोपींनी हा बलात्कार केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. संबंधित दोन्ही आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस जागोजागी छापे टाकत आहेत. दोन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.