पुणे बातमी

पुण्यात प्रेमाला नकार दिल्याने नशेचं इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार

पुणे : नशेचे इंजेक्शन देऊन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या प्रकरणी समीर भालेराव याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून तो अद्याप फरार आहे. अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली. आरोपी समीरने फिर्यादीला प्रपोज केले होते. परंतु, तरुणीने नकार दिल्याने त्याच्या रागातून त्याने तिच्यावर बलात्कार केला असल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी समीर भालेरावने फिर्यादी तरुणी हे एकमेकांना ओळखतात. समीर हा रॅपर गायक असून त्याने अनेक मुलींना मॉडेलिंगचे काम मिळवून दिले होते. फिर्यादीला देखील मॉडेलिंगची आवड असल्याने दोघांची ओळख झाली. समीरने फिर्यादीचा मोबाईल नंबर घेतला. तो फिर्यादीला मेसेज करत असे. काही दिवसांनी त्याने पीडित तरुणीला एकतर्फी प्रेमातून प्रपोज केले. मात्र, त्यास तरुणीने नकार दिला. यामुळे समीर दुखावला गेला होता.

त्याने २५ सप्टेंबर २०२० रोजी तरुणीच्या घरी जाऊन तू माझ्यासोबत चल असे म्हटले होते. तेव्हा देखील तरुणीने नकार दिला होता. घरात पीडित तरुणी आणि ११ वर्षीय भाऊ होता, आई धुनी भांडी करत असल्याने व वडील रिक्षा व्यवसाय करत असल्याने बाहेरच होते. याचा फायदा घेऊन त्याने लहान भावाच्या हाताला धरून घराबाहेर जात तुझ्या भावाचे काय होईल याचा विचारही करू नकोस अशी धमकी दिल्याने पीडित तरुणी भावासह कारमध्ये बसली.

तरुणीला पुण्याजवळील राहत्या घरी आणले. घराला बाहेरून कुलूप लावून पीडित १८ वर्षीय तरुणीवर आरोपी समीर हा वारंवार बलात्कार करत असल्याने ती भयभीत झाली होती. तसेच तरुणीला झोपेत असताना नशा करण्याचे इंजेक्शन देत असे असे तरुणीने दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. हा सर्व प्रकार १७ जुलै २०२१ पर्यंत सुरू होता.