खासदाराने बलात्कार केला म्हणत स्वतःला पेटवून घेणाऱ्या महिलेचा मृत्यू
देश बातमी

खासदाराने बलात्कार केला म्हणत स्वतःला पेटवून घेणाऱ्या महिलेचा मृत्यू

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयासमोर एका २४ वर्षीय महिलेने आपल्या मित्रासह स्वतःला पेटवून घेतलं होतं. या महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. तर तिच्यासोबतच्या तरुणाचा या आधीच म्हणजे शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

ही महिला उत्तरप्रदेशातल्या गाझिपूर जिल्ह्यातली विद्यार्थिनी होती. ती १६ ऑगस्टला आपल्या मित्रासोबत दिल्लीमध्ये आली होती. या दोघांनीही एकमेकांना पेटवून घेण्याआधी एक फेसबुक लाईव्ह केलं होतं. या लाईव्हमध्ये तिने बसपा खासदार अतुल राय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्याचबरोबर उत्तरप्रदेश पोलीस आणि न्यायाधीशही या प्रकारात सामील असल्याचा गंभीर आरोप तिने केला होता.