अर्नबने तोडला सावरकरांचा रेकॉर्ड; 280वेळा माफी मागून बनले महावीर
देश बातमी

अर्नबने तोडला सावरकरांचा रेकॉर्ड; 280वेळा माफी मागून बनले महावीर

नवी दिल्ली : हेट स्पीचच्या मुद्द्यांवरुन रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना २० हजार पौंडांचा दंड लागला होता. त्यावरून अर्णब गोस्वामी यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, माझ्या कार्यक्रमात एक चूक झाली असून मी त्याबद्दल माफी मागत आहे. चॅनलने एक माफीनामा लिहला असून तो ६ सप्टेंबर २०१९ रोजी प्रसारित झालेल्या पूछता है भारत या कार्यक्रमात आक्रमक आणि भडखाऊन शब्द वापरल्याबद्दल आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या कार्यक्रमात वापरलेल्या शब्दांमुळे जर कोणत्या समाजाच्या किंवा धर्माच्या भावना दुखावल्या असतील तर रिपब्लिक मीडिया टीव्ही नेटवर्क त्या सर्वांची माफी मागत आहे. चॅनलने दंड लावल्यानंतर माफी मागताना यूके ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर ऑफकॉमला सांगितले आहे की आमच्याकडून चूक झाली असून आम्ही त्याबद्दल माफी मागत आहोत.

चॅनलकडून 26 फेब्रुवारी 2020 ते 9 एप्रिल 2020 पर्यंत 280वेळा प्रत्येकदिवशी प्रत्येक तासाला ही माफी इंग्रजी आणि हिंदीमध्ये प्रसारित करण्यात आली होती. चॅनलकडून 280वेळा माफी मागितल्यानंतर अर्णब गोस्वामीची तुलना सोशल मीडियावर विनायक दामोदर सावरकर यांच्यासोबत करण्यात येत आहे. सावरकरांनीही आपल्या सुटकेसाठी ब्रिटिश सरकारला सातत्याने पत्रव्यवहार केला असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे.

ट्विटर युजर समर अनार्याने ट्वीट करत म्हटले आहे की, सावरकरांनी 5वेळा इंग्रजांची माफी मागितली होती. भाजपने त्यांना वीर म्हटले होते. रिपब्लिक भारत आणि अर्नब गोस्वामीने 280वेळा ब्रिटिशांकडे माफी मागितली आहे. मग अर्णबला काय म्हणायला हवं? महावीर गोस्वामी? की परमवीर गोस्वामी? असा सवाल त्याने केला आहे.