Arnab-Goswami
देश बातमी

रिपब्लिक टीव्हीच्या ब्युरो चिफचा राजीनामा; म्हणाले, ‘अर्णब TRP चे भुकेले’

नवी दिल्ली : भाजप खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेत सुरु असलेला इंग्रजी न्यूज चॅनेल पत्रकारितेच्या सिद्धांतांवर कशाप्रकारे हत्या करत आहे, याचा खुलासा रिपब्लिक टीव्हीचे माजी ब्युरो चीफ तेजिंदर सिंह सोढी यांनी एक पत्र लिहून केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

सध्या रिपब्लिक टीव्ही चॅनेलवर विरोधकांविरोधातच अजेंडा सुरु आहे. त्यानुसार काम केले जात आहे. रिपब्लिक टीव्ही पत्रकारितेची उघडपणे हत्या करत आहे. त्यामुळेच मागील आठवड्यात माझ्यासह अनेक पत्रकारांनी राजीनामे दिले. जेव्हा मी या चॅनेलमध्ये नोकरीस आलो तेव्हाची पत्रकारिता आणि आताची पत्रकारिता यामध्ये बराच फरक आहे.

अर्णब गोस्वामी यांनी गंभीर पत्रकारितेची हत्या केली. रिया चक्रवर्ती हिचा इंटरव्यू घेता आला नाही म्हणून अनेक पत्रकारांना अपमानित करण्यात आले. त्यामुळेच अनेक पत्रकारांनी राजीनामे दिले.

पत्रकारांना करतात अपमानित

अर्णब गोस्वामी यांनी रिया चक्रवर्तीची मुलाखत घेता आली नाही म्हणून पत्रकारांना खडेबोल सुनावले. तसेच त्यांनी अनेक पत्रकारांना अपमानितही केले. त्यामुळे अनेक पत्रकारांनी राजीनामे दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत