दिलासादायक! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा
पुणे बातमी

दिलासादायक! पुण्यातील निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा

पुणे : पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. पुण्यातील मॉल्स आणि दुकानं उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मॉल्सबरोबर दुकानं ७ तर हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून हा निर्णय लागू होणार असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यांच्या आत राहिला, तरच हे लागू होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतल्यानंतर निर्बध शिथिल करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे.