पुणेकरांसाठी मोठी बातमी; शहरात २८ नोव्हेंबरपासून रिक्षा धावणार नाहीत, कारण…
पुणे बातमी

पुणेकरांसाठी मोठी बातमी; शहरात २८ नोव्हेंबरपासून रिक्षा धावणार नाहीत, कारण…

पुणे : ओला, उबेर, रॅपिडो कंपनीकडून ॲपद्वारे बेकायदेशीर टू व्हीलरवर होणारी प्रवासी वाहतूक थांबवावी यासाठी पुण्यातील रिक्षा संघटना आक्रमक झालेल्या असून येत्या २८ नोव्हेंबरपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बेमुदत बंदचा इशारा पुण्यातील १२ रिक्षा संघटनांनी दिला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्या वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरात बेकायदा बाईक टॅक्सीची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. या सर्व बेकायदा व्यावसायिकांमुळे प्रवाशांची सुरक्षा धोक्यात येत असून कायदेशीररित्या व्यवसाय करणाऱ्या जवळपास सव्वा लाख रिक्षा चालकांचे परिवार रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आता बंदचा निर्णय घेतल्याचं रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आरटीओ कार्यालयासमोर बेमुदत चक्काजाम आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील विविध संघटनाने पुण्यात दिलेला आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये सव्वा लाख रिक्षा चालक व्यावसायिक आहे त्यातले ५० ते ६० हजार रिक्षा चालक २८ तारखेपासून बंद मध्ये सहभागी होणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील संघटनांनी दिलेली आहे. यामध्ये १२ विविध संघटना सहभागी झालेल्या असणार आहेत.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांची गैरसोय होणे म्हणून या संघटनातर्फे पन्नास रिक्षा या आपत्कालीन व्यवस्थेसाठी आम्ही तयार ठेवलेल्या आहेत. त्यासाठी एक नंबर सुद्धा या संघटनाकडून देण्यात आलेला आहे. अतिशय अत्यावश्यक सेवेमध्ये ही रिक्षा नागरिकांना उपलब्ध होणार असल्याची माहिती संघटनांकडून देण्यात आली आहे.

पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पीएमटी नंतर सगळ्यात मोठी वाहतूक व्यवस्था ही रिक्षा चालकाचीच आहे. त्यामुळे या रिक्षा बंद झाल्या तर शहरावरील प्रवासी वाहतुकीचा ताण वाढेल आणि नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. विविध राजकीय पक्षाच्या संघटना सुद्धा यात सहभागी होणार असून १ लाख २० हजार कुटुंब यात सहभागी होणार आहेत, अशी माहिती या संघटनांनी दिली आहे.