बातमी विदेश

काबुल पुन्हा हादरलं! विमानतळाजवळ रॉकेट हल्ला

काबुल : अफगाणीस्तानची राजधानी काबुल पुन्हा हादरली आहे. काबुलच्या विमानतळ परिसरात पुन्हा रॉकेट हल्ला झाला आहे. यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात तीनजण गंभीर जखमी झाल्याची माहिती असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

अफगाणिस्तानमध्ये अडकून पडलेल्या परदेशी नागरिकांचं रेस्क्यु ऑपरेशन सुरु असताना झालेल्या या हल्ल्यामुळे काबुलमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. काबुलमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नॉर्थ गेटजवळ एका घरावर हे रॉकेट आढळलं. या घटनेचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड झाला असून हे रॉकेट थेट घरात घुसल्याचं त्यातून दिसतं. या घरात असणाऱ्याच दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यानंतर अमेरिकेने हल्लेखोरांना इशारा दिला होता. हल्लेखोरांना धडा शिकवण्याचा इशारा अमेरिकेनं देऊन काही तास उलटायच्या आत हल्लेखोरांनी हा दुसरा हल्ला केला आहे. गर्दीच्या भागात हे रॉकेट डागण्याची मूळ योजना असावी, मात्र ते घरावर कोसळल्याचं सांगितलंजात आहे. गर्दीच्या ठिकाणी ते कोसळलं असतं, तर अधिक जीवितहानी होण्याची शक्यता होती.

Leave a Reply

Your email address will not be published.