ट्विटरची मोहीम; मोहन भागवत यांच्यासह ‘या’ बड्या नेत्यांच्या हँडलवरुन ब्लू टिक गायब
देश बातमी

ट्विटरची मोहीम; मोहन भागवत यांच्यासह ‘या’ बड्या नेत्यांच्या हँडलवरुन ब्लू टिक गायब

नवी दिल्ली : सरकारच्या नव्या गाइडलाइन्सवरून ट्विटर आणि सरकार यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद आहे. नव्या गाइडलाइन लागू करण्याबाबत ट्विटरने अद्याप काही सकारात्नमक अशी भूमिका मांडलेली नाही. अशात आता ट्विटरनं देशातील मोठमोठ्या नेत्यांच्या ट्विटर हँडलची ब्लू टिक हटवण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला ट्विटरनं उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाउंटची ब्लू टिक हटवली होती. ती वापस सुरु करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या नावांसमोरील ब्लू टिट हटविण्यात आली आहे. त्याचबरोबर संघातील सुरेश सोनी आणि अरुण कुमार यांच्यासह इतरही वरिष्ठांच्या नावसमोरील ब्लू टीकही ट्विटनं हटविण्यात आली आहे.

ट्विटरच्या या मनमानी कारभारामुळे सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच ट्विटरविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. ट्विटरवरील ब्लू टिक ही एखादं अकाउंट मोठ्या किंवा प्रसिद्ध व्यक्तीचं अधिकृत अकाउंट असल्याचं दर्शवत असते. यात सरकारी कंपन्या, मोठे ब्रॅन्ड, मोठ्या संस्था, वृत्तसंस्था, पत्रकार, कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते, नेते आणि इतर बड्या व्यक्तींचा समावेश असतो.