लहान मुलांसाठी कोरोना लस तयार; या महिन्यात होणार लाँच
बातमी विदेश

लहान मुलांसाठी कोरोना लस तयार; या महिन्यात होणार लाँच

नवी दिल्ली : लहान मुलांनाही लवकरात लवकर कोरोना लस देण्याची धडपड सुरू आहे. लहान मुलांसाठी खास कोरोना लस तयार करण्यात आली आहे. नेझल स्प्रे स्वरूपात ही लस तयार करण्यात आली आहे. रशियामध्ये ही लस तयार केली असून ती सप्टेंबरमध्येच लाँच केली जाणार आहे. सध्या भारतात परवानगी मिळालेली रशियाची स्पुतनिकV लसच आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गॅमेलिया इन्स्टिट्यूटचे प्रमुख अॅलेक्झांडर गिंट्सबर्ग यांनी सांगितले, आम्ही तयार केलेला नेझेल स्प्रे ही स्पुतनिक V लस आहे. ती फक्त इंजेक्शनऐवजी नोझलमार्फत दिली जाईल. 15 सप्टेंबरपासून ही लस उपलब्ध होईल. 8 ते 12 वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. या वयोगटातील मुलांवर या लशीची चाचणी घेण्यात आली आहे. त्यांच्यावर कोणताही दुष्परिणाम दिसला नाही. त्यांच्या शरीराचे तापमानही वाढले नाही, असे गिंट्सबर्ग यांनी सांगितले.

भारतात लहान मुलांना दिली जाणार का?
भारतात सध्या लहान मुलांसाठी भारतातच तयार करण्यात आलेली भारत बायोटेकची कोवॅक्सिन लशीला मंजुरी मिळालेली आहे. यांचे लहान मुलांवर ट्रायलची तयारी सुरू आहे. आठ आठवड्यात हे ट्रायल पूर्ण होणार असल्याचं कंपनीने सांगितले आहे. भारतात सध्या आपात्कालीन मंजुरी मिळालेल्या तीन लशींमध्ये रशियाच्या स्पुतनिक V लशीचाही समावेश आहे. त्यामुळे कदाचित या लशीचा वापर लहान मुलांवरही होऊ शकतो.