युक्रेनवर हल्ला चढवणाऱ्या रशियाला मोठा फटका, ३५०० सैनिक ठार
बातमी विदेश

युक्रेनवर हल्ला चढवणाऱ्या रशियाला मोठा फटका, ३५०० सैनिक ठार

मॉस्को / कीव : रशिया आणि युक्रेन दरम्यान आता प्रत्यक्ष युद्धाला सुरूवात झालीय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केल्यानंतर रशियाकडून युक्रेनची राजधानी ‘कीव’वर हल्ला चढवण्यात आला. युक्रेनचा एअरबेस आणि एअर डिफेन्स उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलाय.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

युक्रेनवर हल्ला चढवणाऱ्या रशियाला मोठा फटका

युक्रेनकडून रशियाच्या नुकसानीची एक यादीच जाहीर करण्यात आलीय. युक्रेनियन मीडिया ‘द कीव्ही इंडिपेंडन्ट’नं जाहीर केलेल्या यादीनुसार, आत्तापर्यंत रशियाचे ३५०० सैनिक युद्धात ठार झालेत. तर १०२ टँक, ५३६ सैन्य वाहन, १५ तोफा, १४ लढावू विमान, ८ हेलिकॉप्टर आणि एक बीयूके-सिस्टम युक्रेनकडून नष्ट करण्यात आलंय.

या’ देशांची युक्रेनला मदत

युक्रेननं रशियासमोर गुडघे टेकण्यास स्पष्टपणे नकार दिलाय. दोन्ही देशांतील सद्य परिस्थिती पाहता ब्रिटन, अमेरिका तसंच इतर युरोपीय देशांसह २८ देशांनी युक्रेनला अधिक शस्त्रास्त्र, आरोग्य सुविधा आणि इतर लष्करी मदत देण्यावर सहमत व्यक्त केलंय.

युक्रेनमधून ४००० हून अधिक लोक मायदेशी परतले

परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एव्हाना युक्रेनमधून ४००० हून अधिक भारतीय मायदेशात सुखरुप परतले आहेत. परंतु, अद्यापही अनेक जण युक्रेनमधल्या अस्थिर वातावरणात अडकून पडले आहेत. भारत आपल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे आणि आम्ही लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत, युक्रेनची एअरस्पेस बंद आहे त्यामुळे आम्ही जमिनीचा मार्ग वापरत आहोत, असंही मीनाक्षी लेखी यांनी म्हटलंय.