मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याच्या नादात मंत्र्यांचा मृत्यू
बातमी विदेश

मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याच्या नादात मंत्र्यांचा मृत्यू

नवी दिल्ली : मॉक ड्रीलदरम्यान कॅमेरामनला वाचवण्याच्या प्रयत्नात एका रशियन मंत्र्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रशियाचे आपत्कालीन मंत्री येवगेनी झिनिचेव यांचं बुधवारी आर्क्टिक प्रदेशातल्या आपत्कालीन प्रशिक्षणादरम्यान (मॉक ड्रील) निधन झालं आहे. आरआयए या वृत्तसंस्थेने रशियन आपत्कालीन मंत्रालयाच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

झिनिचेव हे ५५ वर्षांचे होते. २०१८ पासून झिनिचेव यांनी हाय-प्रोफाइल आपत्कालीन मंत्रालयाचं नेतृत्व केलं होतं. रशियन अध्यक्षीय कार्यालय क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी झिनिचेव यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनाही या दुःखद घटनेची माहिती देण्यात आली आहे. आता त्यांचा मृतदेह मॉस्कोला आणण्याची तयारी सुरू आहे.

असा झाला अपघात
रशियाच्या आरटी टेलिव्हिजन चॅनेलच्या मुख्य संपादिका मार्गारीटा सिमोनियन म्हणाल्या की, झिनिचेव्ह हे एका कॅमेरामनसह एका कड्यावर उभे होते. तो कॅमेरामन घसरला आणि काही पाण्यात पडला. त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणतात कि, दुर्घटनास्थळी मोठ्या संख्येने साक्षीदार होते. नेमकं काय घडलं हे कळण्याच्या आतच त्या कॅमेरामॅनला वाचवण्यासाठी त्यांनी पाण्यात उडी घेतली आणि एका खडकावर आदळले. दुर्दैवाने त्या कॅमेरामनचा देखील मृत्यू झाल्याचं सिमोनियन यांनी यावेळी सांगितलं आहे.