एनआयए’ने अटक केल्यानंतर अखेर सचिन वझे यांच निलंबन
बातमी मुंबई

एनआयए’ने अटक केल्यानंतर अखेर सचिन वझे यांच निलंबन

मुंबई : देशातील प्रसिध्द उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार काही दिवसांपूर्वी आढळून आली होती. या प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत राष्ट्रीय तपासा यंत्रणा (एनआयए)कोठडी सुनावली आहे. एनयाएच्या या कारवाईनंतर आता सचिन वझेंचं पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. याचपार्श्वभूमीवर कारवाई करवाई करण्यात आली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

दरम्यान, सचिन वझे यांना ताब्यात घेतल्यापासून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. अंबानींच्या घराजवळ कार नेऊन ठेवण्यामागील उद्देश काय होता? भीती दाखवून त्यांना काय साध्य करायचे होते, याचा तपास सुरू आहे. सचिन वझे केवळ स्वतःच्या हिमतीवर इतके मोठे धाडस करू शकत नाहीत, त्यांच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी व राजकीय वर्तुळातील एखाद्याचा हात असल्याच संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ते कोणाच्या संपर्कात होते, याची माहिती घेतली जात आहे. याचदरम्यान आता महत्वाची माहिती एनआयएच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे.

एनआयए’ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

त्याचबरोबर, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सचिन वझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे.