मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
देश बातमी

मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

लखनौ : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांची प्रकृती खालावली असून बुधवारी दुपारी त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत रुग्णालयाकडून अद्याप कोणतेही माहिती देण्यात आली नाही. परंतु, असे मानले जाते की ८१ वर्षीय मुलायमसिंह यादव यांच्यावर वृद्धापकाळामुळे आलेल्या अरोग्याच्या समस्येवर उपचार केले जात आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मुलायमसिंह यांना गेल्या काही वर्षांपासून आरोग्याशी संबंधित अनेक समस्या भेडसावत आहेत. गेल्यावर्षी त्यांना मूत्रपिंडाच्या विकारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये मुलायम यांना कोरोनाचा देखील संसर्ग झाला होता. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. मुलायमसिंह राजकीयदृष्ट्या सध्या सक्रिय नाहीत. मात्र सपा नेते त्यांची भेट घेत राहतात. मुलायम स्वत: अनेकदा सपा कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी बोलत असतात.

कानपूरमध्ये समाजवादी पार्टीने ठिकठिकणी अब युपी में खेला होई अशा घोषणा असणारे फलक लावले आहेत. या फलकावर समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव, समाजवादी पार्टीचं सायकल चिन्हं आणि स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत. या घोषणेद्वारे समाजवादी पार्टीने योगी सरकारविरुद्ध शंखनाद केला आहे. समाजवादी पार्टीचे कानपूर शहरप्रमुख डॉ. इम्रान यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.