संभाजी ब्रिगेडचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा; ७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन
पुणे बातमी

संभाजी ब्रिगेडचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा; ७ डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

पुणे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात लढणाऱ्या दिल्लीतील शेतकऱ्यांनी येत्या ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला आता पुण्यातील संभाजी ब्रिगेड संघटनेने देखील या बंदला समर्थन दिले आहे.केंद्र सरकारने केलेला शेतकरी विरोधी कायदा रद्द करा, शेतीमालास हमीभाव जाहीर करावा.या मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॕड. मनोज आखरे यांच्या नेतृत्वाखाली ०७ डिसेंबरला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. ‘शेतकऱ्यांसाठी संभाजी ब्रिगेडचे वादळ महाराष्ट्रभर गाजले पाहिजे,’ असे आवाहनही संघटनेचे महाराष्ट्राचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकार’ने शेतकरी विरोधी कायदा केला आहे. त्या विरोधात दिल्लीचे तक्त हलवण्यासाठी पंजाब व हरियाणा राज्यातील शेतकरी दिल्लीत आठ दिवसापासून आंदोलन करत आहेत. दोन शेतकऱ्यांनी स्वतःचा जीव दिला आहे. या आंदोलनास व ८ डिसेंबररोजी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ ला संभाजी ब्रिगेड चा सुद्धा ‘पाठिंबा’ आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही तालुका व जिल्हा स्तरावर संभाजी ब्रिगेड संघर्ष करणार आहे. आपण शेतकऱ्यांची पोरं… शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू…!! अशी भूमिका संभाजी ब्रिगेड संघटनेने घेतली आहे.

दरम्यान, गेल्या नऊ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांचा संयम सुटला आहे. नऊ दिवस झाले तरी सरकार कृषी कायदा मागे घेत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येत्या 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक दिली आहे. कृषी कायदा रद्द व्हावा म्हणून शेतकरी अत्यंत आक्रमक झाले आहेत. शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणाविरोधात रोष व्यक्त केला. सरकार कायद्यात दुरुस्ती करण्यास तयार आहे. एमएसपीवर कायदा बनवायलाही सरकार तयार आहे. पण आम्हाला हा कायदाच नकोय. हा कायदा रद्द केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे आम्ही सर्वानुमते 8 डिसेंबर रोजी बंद करण्याचा निर्णय घेतला असून देशातील प्रत्येक राज्यात आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेतकरी नेत्यांनी सांगितलं.