देश बातमी

कृषि क्षेत्राशी संबधित विधेयकावर संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल; म्हणाले…

नवी दिल्ली : ” देशातील ७० टक्के लोक शेतीशी जोडले गेलेले आहेत. संपूर्ण लॉकडाउनच्या काळात शेतकरी काम करत होता. ही विधेयके मंजुर झाल्यानंतर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होणार का?,यापुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही,” याची ग्वाही सरकार देणार का?,” असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज राज्यसभेत उपस्थित केला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

केंद्र सरकारने कृषि क्षेत्राशी संबंधित असलेली दोन विधेयके लोकसभेतील मंजुरीनंतर आज राज्यसभेत मांडली. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा), शेतकरी (हक्क आणि सुरक्षा) दर हमी ही दोन विधेयक केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी राज्यसभेत मांडली. ”हे दोन्ही कायदे ऐतिहासिक असून, शेतकऱ्यांच्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणतील. शेतकरी त्यांचा शेतमाल देशभरात कुठेही मुक्तपणे विकू शकतील. मी शेतकऱ्यांना आश्वासित करतो की ही विधेयके एमएसपीशी संबधित नाहीत,” असं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी विधेयक मांडताना सांगितलं.

या विधेयकांवर चर्चा करताना विरोधी पक्षांच्या खासदारांनी भूमिका मांडली. संजय राऊत यांनीही विधेयकावरून सरकारला धारेवर धरत काही प्रश्न उपस्थित केले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्या राजीनाम्यावरूनही राऊत यांनी मोदींना टोला लगावला.

संजय राऊत म्हणाले,”या विधेयकांना देशभरातील काही शेतकऱ्यांनी विरोध केला आहे तर काही शेतकऱ्याना या विधेयकाबाबत काही गैरसमज आहेत. सरकारने हे गैरसमज दूर करावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की, विधेयकाबाबत काही अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मला विचारायचं की, अफवेमुळेच एका मंत्र्यानं राजीनामा दिला का?,” असा सवाल राऊत यांनी मोदी सरकारला केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत