कोरेगाव भीमामध्ये ४ दिवस जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
पुणे बातमी

कोरेगाव भीमामध्ये ४ दिवस जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे विजय स्तंभाच्या ठिकाणी ४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. भीमा कोरेगावसह आजूबाजूच्या १६ गावांमध्ये ३० डिसेंबर ते २ जानेवारी २०२१ पर्यंत नागरिकांना प्रवेश बंदी करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी काढले आहेत. भीमा कोरेगावमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

१ जानेवारी रोजी लाखो नागरिक येत असतात. पण यंदा करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर वर्षभरामध्ये आपण सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहे. हे लक्षात घेऊन ही जमावबंदी लागू करण्यात आली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाच्या कार्यक्रमाचे प्रसारण १ जानेवारीला दिवसभर दूरदर्शन आणि समाज माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

या १६ गावांत जमावबंदी
भीमा कोरेगाव
लोणीकंद
पेरणे
तुळापूर
बकोरी
वढू खुर्द
केसनंद
कोलवडी
डोंगरगाव
फुलगाव
सणसवाडी
वढू बुद्रुक
पिंपळे जगताप
वाजेवाडी
आपटी
वाडेगाव