शेअर बाजारात तेजी; रचला नवा विक्रम
बातमी मुंबई

शेअर बाजारात तेजी; रचला नवा विक्रम

मुंबई : भारतीय शेअर बाजारात मागील काही दिवासांपासून तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटने पुन्हा एक इतिहास रचत ५८ हजारांचा पल्ला गाठला आहे. सेन्सेक्स पहिल्यांदाच ५८ हजारांच्या पार गेला आहे. आज (ता. ०३) सकाळच्या सत्रात मार्केट सुरु होताच २१७ अंकांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. यामुळे सेन्सेक्स ५८,०६९ वर पोहोचला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

त्याचबरोबर निफ्टीत ६६.२० अंकांची वाढ पाहायला मिळाली. यामुळे निफ्टी १७ हजार ३०० अंकांवर पोहोचला होता. जागतिक बाजारातील सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर दिसत आहेत. आशियाई बाजारातही तेजी बघायला मिळत आहे. दुसरीकडे अमेरिकेतही एलअँडपी ५०० आणि एनएएसडीक्यू विक्रमी अंकांवर बंद झाले होते. देशातील कोरोना रुग्णांमध्ये झालेली घट आणि वेगाने वाढणारी लसीकरण मोहीत याचे सकारात्मक परिणाम बाजारावर दिसून येत आहेत.

गुरुवारी शेअर बाजारात दिवसभराच्या उलाढालीनंतर तेजी पाहायला मिळाली होती. सेन्सेक्स ५१४.३३ अंकासह ५७,८५२.५४ अंकांवर बंद झाला होता. तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टी १५७.९० अंकांसह १७.२३४.१५ अंकांवर बंद झाला होता.