पुण्यात मोठे सेक्स रॅकेट उघड; 16 नायजेरियन तरुणी ताब्यात
पुणे बातमी

पुण्यात मोठे सेक्स रॅकेट उघड; 16 नायजेरियन तरुणी ताब्यात

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड भागातील पिंपळे गुरव परिसरात चालणारे मोठे सेक्स रॅकेट पोलिसांनी उघड केले आहे. सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या या कारवाईत तब्बल 16 नायजेरियन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पिंपळे गुरव परिसरातल्या एका इमारतीत या तरुणी व्यवसाय करत होत्या. त्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

गेल्यावर्षी जानेवारीमध्ये स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. पुन्हा पिंपरी-चिंचवडमध्ये रॅकेट सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, पिंपरी- चिंचवड परिसरात स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली गतवर्षी सेक्स रॅकेट चालविण्यात येत असल्याचे उघड झाले होते.

तसेच, मुंबई जवळच्या कल्याण येथेही काही महिन्यांपूर्वी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. चार बांग्लादेशी महिलांसह दलाला पोलिसांनी घेतल ताब्यात घेतले होते. हे सेक्स रॅकेट घरातच चालत होते. कल्याण पूर्वेतील नांदीवली परीसरातील एका इमारतीमधील घरावर छापा टाकून ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिक सेलने या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी पोलिसांनी चार महिलांना ताब्यात घेतले. या चारही महिला बांग्लादेशी असल्याचे पोलिसांची माहिती दिली.