शरद पवार रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया
बातमी महाराष्ट्र

शरद पवार रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडी रुग्णालयात होणार शस्त्रक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती रविवारी सायंकाळी अचानक बिघडली. अचानक पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

रविवार सायंकाळी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तपासणीतून त्यांना पित्ताशयाचं निदान झालं आहे. त्यामुळे शरद पवार यांना पुन्हा ३१ मार्च रोजी रुग्णालयात दाखल करण्यात येणार असून, एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.

मलिकांनी ट्विट करून दिली माहिती…
आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना थोडं अस्वस्थ वाटत होतं. काल संध्याकाळी पोटात दुखू लागल्यामुळे त्यांना तपासणीसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथं तपासण्या झाल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचं निदान झालं आहे. शरद पवारांना हा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना देण्यात येणारी रक्त पातळ करण्याची औषधं थांबवण्यात आली आहेत. त्यांना ३१ मार्च २०२१ रोजी रुग्णालयात अॅडमिट करण्यात येणार आहे. तिथे त्यांची एण्डोस्कोपी आणि शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील सूचनेपर्यंत त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नवाब मलिक यांनी ट्विट करून दिली आहे.