शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
उत्तर महाराष्ट् बातमी

शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेचा पदाधिकारी असलेल्या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आळी आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. नाशिक येथील पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उमेश नाईक असं या व्यक्तीचे नाव असून असे वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. उमेश नाईक हे काळाराम परिसरात राहत होते. त्यांचे जुने घर हे नागचौक परिसरात आहे. शुक्रवारी उमेश नाईक आपल्या पत्नीला जुन्या घरी जात असल्याचे सांगितले. घरात रंगकाम करायचे आहे, त्यामुळे जाऊन येतो असा निरोप त्यांनी पत्नीला दिला. नागचौक येथील जुन्हा घरी पोहोचल्यानंतर उमेश यांनी घरातील स्लॅबला दोर लावून गळफास घेतला.

बराच वेळ झाल्यामुळे उमेश नाईक घरी परतले नसल्यामुळे कुटुंबीयांनी फोन करून विचारणा केली, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. शेवटी जुन्या घरी जाऊ पाहणी केली असता उमेश यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला.