शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या जाळ्यात
बातमी मुंबई

शिवसेनेचा आणखी एक मोठा नेता ईडीच्या जाळ्यात

मुंबई : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेचा आणखी एक नेता ईडीच्या जाळ्यात अडकणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

शिवसेनेचे माजी खासदार आणि सीटी बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या घरी आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी धाड टाकली. यावेळी आनंदराव अडसूळ यांना ईडीचे अधिकारी अधिक चौकशीसाठी ताब्यात घेणार अशीही चर्चा सुरू झाली होती. मात्र आनंदराव अडसूळ यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना गोरेगावमधील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ईडीचे अधिकारी आणि सुरक्षा रक्षकही तैनात असून अडसूळ यांचे कुटुंबीयदेखील त्यांच्या सोबत आहेत. आज सकाळी 10 वाजता हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले आनंदराव अडसूळ गेले 9 तास उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती ठिक झाल्यावरच त्यांना ईडीचे अधिकारी चौकशीसाठी ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

सिटी बँकेत 900 कोटींच्या घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. भाजप आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर आता ईडी त्यांची चौकशी करणार आहे. आनंदराव अडसूळ सिटी बँकेचे अध्यक्ष असताना हा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. अडसूळांचे नातेवाईक बँकेच्या संचालक मंडळावर होते. त्याचवेळी कर्ज वाटपात अनियमितता आणि एनपीएमध्ये घसरण झाली. घसरणीमुळे बँक गेल्या 2 वर्षांपासून बँक बुडीत आहे.

5 जानेवारी रोजी बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी आंनदराव अडसूळ यांनी सिटी को-ऑप बँकेत घोटळा केल्याचा आरोप केला. अडसूळ यांच्या विरोधात कागदपत्र सादर करण्यासाठी राणा ईडीच्या कार्यालयातही गेले होते. मुंबईमध्ये सिटी को-ऑप बँकेच्या 13 ते 14 शाखा आहेत. या बँकेत 900 खातेदार असून ही बँक बुडण्यास अनधिकृतरित्या वाटण्यात आलेलं कर्ज कारणीभूत असल्याचा आरोप रवी राणा यांच्याकडून करण्यात आला होता. अडसूळ यांनी बँकेची प्रॉपर्टी भाड्यानं दिली. खातेदारांना फक्त एक हजार एवढी रक्कम मिळत असल्याचंही रवी राणा यांनी आपल्या आरोपात म्हटलं होतं.