धक्कादायक ! यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू
बातमी विदर्भ

धक्कादायक ! यवतमाळमध्ये सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांत दारु विक्रीवरही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. यातूनच यवतमाळमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. दारूची तलफ झाल्यानंतर काही जणांनी सॅनिटायझर पिल्याने सात जणांचा मृत्यू झाला असून आणखी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचं समोर आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

यवतमाळ जिल्ह्यातील वणी गावात ही घटना घडली आहे. दारूचं व्यसन जडलेल्या काही जणांनी तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले. यात सात जणांचा मृत्यू झाला. यात तिघांचा घरीच मृत्यू झाला आहे. तर चौघांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे. लॉकडाउनमुळे दारूची दुकानं बंद आहेत. त्यामुळे त्यांनी सॅनिटायझरच प्यायले, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.

या घटनेतील इतर आणखी एकजणाची प्रकृती अत्यवस्थ असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दत्ता लांजेवार, नूतन पाथरटकर, गणेश नांदेकर, संतोष मेहर, सुनील ढेंगळे अशी पाच मृतांची नावं आहेत. अत्यवस्थ रुग्णांसह दोघांची नावे समजू शकली नाहीत.