धक्कदायक! आईचा आत्मा परत आणण्यासाठी वीस दिवस पुजाऱ्याने मुलांकडून करून घेतली पूजा
देश बातमी

धक्कदायक! आईचा आत्मा परत आणण्यासाठी वीस दिवस पुजाऱ्याने मुलांकडून करून घेतली पूजा

तामिळनाडू : तामिळनाडूतील दिंडीगुलमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुलांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतरही तिचा आत्मा देव परत करेल या आशेवर एका पुजाऱ्याने तब्बल वीस दिवस त्या मुलांकडून पूजा करून घेतल्याची घेतल्याची घटना घडली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

समोर आलेल्या माहितीनुसार, तमिळनाडूतील दिंडीगुलमधील इंदिरा नावाची महिला दिंडीगुल पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होत्या. मात्र मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त होत्या. या आजारानेच त्यांनी नोकरीतून ऐच्छिक सेवा निवृत्तीसाठी अर्ज केला होता. इंदिरा या पतीपासून वेगळ्या राहत होत्या. तसेच त्यांना एक 13 वर्षाचा मुलगा आणि एक 9 वर्षाचा मुलगी आहे.

किडनीच्या समस्येमुळे पोलिस विभागाकडे ऐच्छिक सेवानिवृत्तीसाठी विनंती केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्या नोकरीवर हजर नव्हत्या. त्यामुळे त्यांची महिला सहकारी हवालदार  त्यांच्या घरी पोहोचली असता त्यांना या धक्कादायक घटना समजली. संबधित महिला हवालदार इंदिरा यांच्या घेरी गेल्या असता त्यांना घरातून खूप दुर्गंध येत असल्याचे लक्षात आले. त्यांनी पहिले की इंदिरा यांचा मृतदेह  पडून आहे आणि त्याभोवती पूजेचे समानही पडले आहे.

महिला हवालदाराने मुलांना इंदिराबद्दल विचारले असता मुलांनी सांगितले की, ‘आई झोपली आहे आणि तिला उठण्याची गरज नाही, नाहीतर देव तिचे नुकसान करेल. महिला हवालदाराला शंका आल्यानंतर त्यांनी आपल्या पोलीस ठाण्यातील इतर अधिकाऱ्यांना देखील ही माहिती कळवली. त्यानंतर पोलीस तपासात २० दिवसांपूर्वीच इंदिरा यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. इंदिरा यांच्या मृतदेहाभोवती पूजेचे बरेच समान पडले होते.

पोलिसांनी अधिक चौकशी केली असता ७ डिसेंबरलाच इंदिरा यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. पण पुजारी सुदर्शन यांच्या सल्ल्याने इंदिरा यांना रुग्णालयात भरती करण्यात आले नाही. ‘इंदिरा यांना रुग्णालयात नेल्यास देव त्यांचे नुकसान करेल, असे सांगून त्यांचा मृतदेह रुग्णालयात नेण्यास नकार दिला. इतकेच नव्हे तर पुजाऱ्याने बाहेरून घराचा दरवाजा लावत तेव्हापासून मुलांसोबत घरातच राहत होता.

घराला बाहेरून दरवाजा लावत तो तब्बल २० दिवस पूजा करत होता. दरम्यान चौकशी नंतर पोलिसांनी सुदर्शन आणि इंदिरा यांच्या बहिणीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.