महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा
बातमी विदेश

महात्मा गांधींच्या पणतीला ७ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : महात्मा गांधींच्या ५६ वर्षीय पणतीला ६२ लाख रुपयांची फसवणूक आणि बनवाट कागदपत्रांच्या प्रकरणी सात वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. आशिष लता रामगोबिन यांना सोमवारी दक्षिण आफ्रिकेतील डर्बन कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. व्यापारी असल्याचे सांगून लता यांनी स्थानिक व्यावसायिकाची ६२ लाख रुपयांची फसवणूक केली. नफ्याचे आमिष दाखवून पैसे घेतले होते असे फसवणूक झालेल्या एसआर महाराज यांनी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उद्योजक एसआर महाराज यांची फसवणूक केल्याचा आरोप लता यांच्यावर लावण्यात आला आहे. महाराजांनी लताला माल आयात करण्यासाठी व सीमाशुल्क भरण्यासाठी ६० लाख रुपये दिले होते. पण असा कोणताही माल महाराजा यांच्याकडे पोहोचवण्यात आला नाही. लता यांनी आश्वासन दिले होते की या नफ्यातील काही भाग ती एसआर महाराजांना देणार आहे.

व्यापाऱ्याची केली फसवणूक
लता रामगोबिन प्रसिद्ध मानवी हक्क कार्यकर्त्या इला गांधी आणि दिवंगत मेवा रामगोबिन यांची मुलगी आहे. लता रामगोबिन यांना डर्बन स्पेशलाइज्ड कमर्शियल क्राइम कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर अपील करण्यासाठी परवानगी नाकारली होती. लता रामगोबिन यांनी ऑगस्ट २०१५ मध्ये न्यू आफ्रिका अलायन्स फुटवेअर वितरकांचे संचालक महाराज यांची भेट घेतली होती अशी माहिती सोमवारी कोर्टाला देण्यात आली. महाराज यांची कंपनी कपडे, बुटांची निर्मिती,विक्री आणि आयात करते. महाराज यांची अन्य कंपन्यांना नफा-समभागांच्या आधारे पैसेही देते. दक्षिण आफ्रिकेच्या हॉस्पिटल ग्रुप नेटकेअरसाठी तागाचे तीन कंटेनर आयात केले आहेत अशी माहिती लता रामगोबिन यांनी महाराजा यांना दिली होती.

फसवणूक करुन घेतले पैसे
आयात खर्च व सीमा शुल्क भरण्यासाठी आपल्याकडे पैशाची कमतरता आहे. तसेच बंदरावरुन सामान खाली उतरवण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे असे लता यांनी महाराजा यांना सांगितले. त्यानंतर लताने त्यानंतर लताने महाराज यांना सांगितले की तिला ६२ लाख रुपयांची गरज आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी लताने वस्तू खरेदी केला असलेला एक कागद महाराज यांना पाठवला होता. त्यानंतर हा कागद खोटा असल्याचे समोर आल्यानंतर महाराज यांनी लता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.