एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये विश्व विक्रमाची नोंद
बातमी विदेश

एकाच वेळी दिला १० बाळांना जन्म; ‘गिनीज बुक’मध्ये विश्व विक्रमाची नोंद

नवी दिल्ली : एखाद्या माहिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचे तुम्हाला सांगितले तर तुम्ही सांगणाऱ्याला वेड्यात काढाल. मात्र दक्षिण आफ्रिकेमध्ये एका महिलेने एकाच वेळी १० बाळांना जन्म दिला असून याची नोंद गिनीज बुकने घेतली आहे. गोसियामी धमारा सिटहोल असे या माहिलेचे नाव आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३७ वर्षीय गोसियामी धमारा सिटहोल यांच्या पोटी एकाच वेळी जन्माला आलेल्या १० बाळांमध्ये सात मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. गरोदर असतानाच डॉक्टरांनी या महिलेला सहा बाळे होतील असा अंदाज व्यक्त केला होता.

मात्र ७ जून रोजी या महिलेच्या पोटात फार दुखू लागल्याने तिच्यावर शस्त्रक्रीया करुन सिझेरियन पद्धतीने बाळांना जन्म देण्याचा निर्णय घेण्यात आला. या महिलेने दहा बाळांना एकाच वेळी जन्म दिल्याने डॉक्टरांना आश्चर्य वाटत आहे. सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत आहे.