स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी
देश बातमी

स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी मंजुरी

नवी दिल्ली : स्पुटनिकच्या सिंगल डोस लसीच्या म्हणजेच स्पुटनिक लाइटच्या भारतीयांवरील तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून मंजुरी मिळाली आहे. लवकरच या चाचण्या सुरू केल्या जातील. गुणवत्ता आणि सुरक्षा प्रमाणीकरणासाठी लसीची पहिली खेप रशियाहून भारतात पाठवण्यात आली आहे. पाठवण्यात आलेली खेप ही पॅनेशिया बायोटेकने तयार केलेली आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

३०जून रोजी स्पुटनिक लाइटच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलची गरज नाकारण्यात आली होती. त्यानंतर, विषय तज्ज्ञ समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तज्ज्ञांच्या पॅनेलने हैद्राबादस्थित डॉ. रेड्डी यांना ५ ऑगस्ट रोजी चाचणी घेण्यास परवानगी दिली होती.

फार्मा कंपनी पॅनेशिया बायोटेकने तयार केलेल्या स्पुटनिक लाइटचे नमुने आधीच गुणवत्ता, सुरक्षा तपासणीसाठी कसौली येथील सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले गेले आहेत, तर हॉस्पिटलमध्ये ट्रायल साइट्स सेट करण्यासाठीही पोहोचले आहेत. या चाचण्यांसाठी स्वयंसेवकांची नोंदणी लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.