केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक
देश बातमी

केरळमध्ये पुन्हा कोरोनाचा उद्रेक

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तर कोरोना रुग्ण अजूनही आढळत आहेत. केरळमध्ये कोरोनाची स्थिती गंभीर असल्याचं दिसून येत आहे. मागच्या तीन दिवसात केरळमध्ये कोरोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. देशाची कोरोनाची आकडेवारी पाहता केरळमधील कोरोना रुग्णसंख्या त्यात ५० टक्क्यांवर आहे. २६ जुलैला ११ हजार ५८६ रुग्ण होते. तर २८ जुलैला ही संख्या २२ हजार ५६ इतकी झाली आहे. तर एका दिवसात १३१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केरळमध्ये ३१ जुलै आणि १ ऑगस्टला संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. केरळमध्ये मलप्पुरम, त्रिशूर, कोझिकोड, एर्नाकुलम, पलक्कड, कोल्लम, अलाप्पुझा, कन्नूर, तिरुवनंतपुरम आणि कोट्टायममध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे.

केरळमध्ये कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्य सरकारसोबत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे.