कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम
बातमी महाराष्ट्र

कडक लॉकडाऊन नाही पण पुढील १५ दिवसांसाठी निर्बंध कायम

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु, आता कोरोनाचा आकडा मोठ्या प्रमाणावर कमी झालेला असल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथील करण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. राज्यात आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोनामुळे झालेले नुकसान आणि एकूण राज्यातील परिस्थितीचा आलेख नागरिकांसमोर मांडताना पूर्णपणे लॉकडाऊन हटविणे शक्य नसल्याचे स्पष्ट करताना काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येत असल्याचे सांगितले.

राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी उद्या (ता. ३०) संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. जनतेवर निर्बंध लादावे लागतात या सारखं दुसरं कटू काम नाही, असं मला वाटत नाही. पण ते मला नाईलाजाने करावं लागत आहे. आपल्या राज्याच्या व सर्वांच्या जीवाच्या काळजी पोटी करावं लागत आहे. असं मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलं.