यूपीएससी मुख्य परीक्षेत हेतल पगारेचे यश
देश बातमी

यूपीएससी मुख्य परीक्षेत हेतल पगारेचे यश

नवी दिल्ली : लोकसेवा आयोगाच्या मुख्य परिक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परिक्षेमध्ये हेतल पगारे हिने मोठे यश मिळवले आहे. मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर, एकूण 761 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये हेतल पगारे हिला ६३० रँक मिळाली आहे. यामध्ये सुभम कुमार यांनी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

परीक्षार्थी https://www.upsc.gov.in/ या वेबसाईटवर आपला निकाल पाहू शकतात. या परिक्षेत खुल्या प्रवर्गातून 263 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. आर्थिक मागास प्रवर्गातून 86, अन्य मागास प्रवर्गातून 229 तर अनुसूचित जाती 122, अनुसूचित जमाती 61 उमेदवारांनी परीक्षा उत्तीर्ण केली आहे.

दरम्यान, 2019 साली घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतही हेतल पगारे यांनी मोठे यश संपादन केले होते. त्यांची उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली होती. हेतल पगारे हे आयएएस अधिकारी कैलास पगारे यांच्या कन्या आहेत.

निकाल कसा पाहावा ?
– सर्वात अगोदर upsc.gov.in या वेबसाईटवर जा
– वेबसाईटवर जाऊन निकालाच्या लिंकवर क्लिक करा
– तुमच्यासमोर एक पीडीएफ येईल
– यामध्ये तुमचा रोल नंबर तसेच नाव सर्च करा
– जर तुमचे नाव आणि रोल नंबर यामध्ये असेल तर तुम्ही उत्तीर्ण आहात.
– हे पीडीएफ डाऊनलोड करुन सेव्ह करा