केरळला अकरावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयानकडून परवानगी
देश बातमी

केरळला अकरावीच्या ऑफलाईन परीक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयानकडून परवानगी

नवी दिल्ली : केरळ सरकारला सर्वोच्च न्यायालयाने अकरावी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी परवानगी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या याचिकेवर सुनावणीदरम्यान राज्याकडून सर्वोच्च न्यायालयास सांगण्यात आले की, सर्व कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून परीक्षांचे आयोजन केले जाईल. यानंतर न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि सीटी रविकुमार यांच्या खंडपीठाने हे म्हणत याचिका फेटाळली की, आम्हाला आशा आणि विश्वास आहे की अधिकाऱ्यांद्वारे सर्व सावधगिरी बाळगली जाईल आणि आवश्यक पावलं उचलली जातील आणि मुलांना कोणताही धोका उद्भवणार नाही.

२७ सप्टेंबरला होईल परीक्षा
इयत्ता अकरावीची परीक्षा अगोदर ६ ते १६ सप्टेंबरपर्यंत आजोयित केली जाणार होती. मात्र विद्यार्थी आणि शिक्षकांच्या मागणीनंतर ही स्थगित करण्याता आली होती. आता ही परीक्षा २७ सप्टेंबर रोजी आयोजित केली जाणार आहे.