घृणास्पद ! पतीनं तांब्याच्या तारेनं शिवलं पत्नीचं प्रायव्हेट पार्ट
देश बातमी

घृणास्पद ! पतीनं तांब्याच्या तारेनं शिवलं पत्नीचं प्रायव्हेट पार्ट

लखनऊ : पती-पत्नीमधील वादाच्या घटनेत एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेशातील रामपुरमध्ये एका नराधमाने विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून या व्यक्तीने आपल्या पत्नीवर अत्याचार केले आहेत. या अत्यंत क्रूर घटनेनंतर पोलिसांनी पतीला अटक केली आहे. त्याशिवाय पीडित महिलेला उपचार करण्यासाठी रुग्णालयात हलविण्यात आलं आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

जनपद रामपूर येथे राहणारा हा नराधम आपल्या पत्नीवर विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेत होता. या गोष्टीवरुन पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं होत असे. असाच वाद सुरू असताना पती हिंसक झाला व त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. महिला ओरडत होती. यादरम्यान पतीने पत्नीचा प्रायव्हेट पार्ट तांब्याच्या तारेने शिवून घेतला.

यादरम्यान महिलाची प्रकृती बिघडली आणि पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल केली असून आरोपीची चौकशी केली जात आहे. पीडितेने पोलिसांना सांगितलं की, पतीने त्याच्या शरीरावर टाके लावले. पती मला पापी समजतो. मी झोपलेली असताना सकाळी सहा वाजता त्याने माझे हात, पाय बांधून ठेवले आणि माझ्या तोंडात कपडा कोंबला. मला ओरडताही येत नव्हतं. त्याने तांब्याच्या तारेने टाके लावले. महिलेने सांगितलं की, तिचा पती तिच्यावर संशय घेतो.