तालिबानच पाकिस्तानला काश्मीर मिळवून देईल; पाकिस्तानी नेत्याचा दावा
बातमी विदेश

तालिबानच पाकिस्तानला काश्मीर मिळवून देईल; पाकिस्तानी नेत्याचा दावा

इस्लामाबाद : तालिबान पाकिस्तानसाठी आपली ताकद वापरून काश्मीर पाकिस्तानला मिळवून देईल, असा दावा पाकिस्तानी नेत्याने दावा केला आहे. इम्रान खान यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफ आणि तालिबानी यांच्यात दृढ संबंध असल्याचं यापूर्वीही जाहीर झालं आहे. आता पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद यांनी तालिबान्यांच्या मदतीनं लवकरच काश्मीर जिंकून घेण्याचा दावा केला आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या नेत्या नीलम इरशाद यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तालिबानच्या मदतीनं काश्मीर जिंकण्याचा दावा केला आहे. अफगाणिस्तानमध्ये आता तालिबानचं सरकार आलं असून लवकरच तालिबानच्या मदतीनं पाकिस्तान भारताकडून काश्मीर जिंकून घेण्यात यशस्वी ठरेल, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे.

https://twitter.com/SAMRIReports/status/1429883964701958144

पाकिस्तानला काश्मीर जिंकण्यासाठी तालिबान का मदत करेल, असा प्रश्न नीलम इरशाद यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी भारतानं आपल्या भूभागाचे तुकडे केल्याचं सांगितलं. आता आम्ही पुन्हा एकत्र येऊन आमचा हक्क मिळवू, असं त्यांनी म्हटलं आहे. सरकारकडे सध्या पॉवर असून तालिबान आम्हाला साथ देईल आणि आम्ही आमचं स्वप्न पूर्ण करू, असा दावा त्यांनी केला आहे.