देशात आतापर्यंत झाले एवढ्या लोकांचे लसीकरण; राज्यांकडे १.६३कोटी लसी शिल्लक
कोरोना इम्पॅक्ट बातमी

देशात आतापर्यंत झाले एवढ्या लोकांचे लसीकरण; राज्यांकडे १.६३कोटी लसी शिल्लक

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार केला. दुसऱ्या लाटेत अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचेही समोर आले आहे. अशात कोरोनावर मात करण्यांसाठी लसीकरण हाच महत्वाचा पर्याय असल्याचे समोर आले आहे. राज्ये व केंद्रशासित प्रदेशांजवळ लसीकरणासाठी अद्याप लसींच्या १.६३ कोटींहून अधिक मात्रा शिल्लक असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितले.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

मोफत आणि राज्यांमार्फत थेट खरेदी अशा दोन्ही श्रेणींच्या माध्यमांतून केंद्राने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत लशींच्या २४ कोटींहून अधिक (२४ कोटी ६० लाख ८०,९००) मात्रा दिल्या आहेत. यापैकी वाया गेलेल्या लसी जमेस धरता लसींच्या एकूण २२ कोटी ९६ लाख ९५ हजार १९९ मात्रांचा वापर झाला आहे. एकूण १ कोटी ६३ लाख ८५ हजार ७०१ मात्रा अजूनही राज्ये व केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत, अशी माहिती मंत्रालयाने दिली.

रविवारी सकाळपर्यंत देशभरात ३२ लाख ४२ हजार ५०३ सत्रांमधून लोकांना लसींच्या एकूण २३ कोटी १३ लाख २२ हजार ४१७ मात्रा देण्यात आल्या आहेत.