विकृती : मृत्यूनंतर कबरीतून मृतदेह बाहेर काढून तरुणीवर बलात्कार
बातमी विदेश

विकृती : मृत्यूनंतर कबरीतून मृतदेह बाहेर काढून तरुणीवर बलात्कार

मुंबई : मानवी संस्कृतीलाच काळिमा फासणारी घटना पाकिस्तानमध्ये घडली आहे. तापामुळे मृत्यू झालेल्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या मृतदेहावर बलात्कार करण्यात आला आहे. संपूर्ण पाकिस्तान स्वातंत्र्यदिनाची तयारी करत असताना त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच १३ ऑगस्ट रोजी सिंध प्रांतामधील थट्टा जिल्ह्यात हा प्रकार घडला.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

या प्रकरणातील अल्पवयीन तरुणीचा तापामुळे १२ ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर तिचे धार्मिक पद्धतीनुसार दफन करण्यात आले. त्याच रात्री आरोपी व्यक्तीनं तिचा मृतदेह कबरीच्या बाहेर काढला. दफनभूमीपासून एक किलो मीटर दूर जंगलात नेऊन मृतदेहासोबत दुष्कृत्य केले. त्यानंतर तो त्या मृतदेहाला तिथंच टाकून फरार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी काही मुलांनी त्या जागी खोदकाम केल्याचे पाहिले. त्यानंतर त्यांनी ही माहिती मुलीच्या वडिलांना दिली. मुलीचे वडील आणि गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीनं मृतदेह शोधण्याचे काम सुरू केले.

तपासात मुलीचा मृतदेह जवळच्या जंगलात फेकून देण्याच आल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह दफन करताना त्यावर असलेलं कफन देखील गायब होते. तसेच त्यावरील कपडे देखील अस्ताव्यस्त होते. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी या मृतदेहाची तपासणी केली. त्यावेळी त्या मृतदेहाशी दुष्कर्म केल्याचं स्पष्ट झालं. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी हा सर्व प्रकार करणाऱ्या आरोपीला ठार मारले आहे.