बातमी विदेश

युरोपातील डेन्मार्कचे फेरो बेट आहे अत्यंत सुंदर; पण…

युरोपीय खंडातील डेन्मार्कची जगातील दुसरा सर्वात सुंदर आणि शांत देश म्हणून ओळख आहे. 57 लाख लोकसंख्या असलेल्या या देशाचे नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासारखे आहे. पण येथील एक प्रथा पाहून आपल्याला वाईट वाटेल. या प्रथेनुसार, दरवर्षी उन्हाळ्यात समुद्र रक्ताने लाल होतो.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

(प्रातिनिधिक छायाचित्र)

डेन्मार्क राज्याचा भाग असलेल्या स्कॉटलंडच्या उत्तरेस 200 मैलांवर फेरो बेट आहे. काही दिवसांपूर्वी फेरो बेटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. या बेटाचे सौंदर्य कोणालाही आकर्षित करु शकते. डेन्मार्कचा भाग असल्यामुळे हे बेट युरोपियन युनियनमध्ये सामील झाले नाही. 2019 मध्ये येथील लोकसंख्या जवळपास 50 हजार इतकी होती.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

या बेटावरील रहिवासी दरवर्षी उन्हाळ्यात ‘द ग्राइंड’ नावाची ही प्रथा आहे. या प्रथेनुसार येथील समुद्रात मासेमारी करतात. विशेष करून वेल माशांची शिकार करतात. त्यानंतर पर्यावरणवाद्यांनी या बेटाच्या प्रथेविरोधात आवाज उठविला.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

या शिकारीमुळे समुद्राचे पाणी रक्ताने लाल होते. मीडिया रिपोर्टनुसार, 2019 मध्ये 1000 हजाराहून अधिक वेल माशांची शिकार करण्यात आली होती. या बेटावरील लोक वेल माशांचे सेवन मोठ्या प्रमाणात करतात. येथील लोक मासे उकडून, तळून किंवा कोरडे खातात. दरम्यान, या प्रथेविरोधात सतत आवाज उठविला जात आहे.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

याठिकाणी मोठ्याप्रमाणात मासेमारी केली जाते. मासेमारी आणि यासंबंधीचे काम येथील लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. वेल माशांच्या शिकारमुळे होत असलेला निषेध पाहून येथील लोक संतप्त झाले आहेत. बेटावरील लोक वेल मासे एकमेकांना पैशाचा व्यवहार न करता एकमेकांना वाटले जातात.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

बेटावरील लोक म्हणतात की, जंगल किंवा इतर स्त्रोतांच्या अभावामुळे समुद्रावर अवलंबून रहावे लागते. बहुतेक खाद्यपदार्थ माशांचेच असते. दरम्यान, या सुंदर बेटावर मोठ्या संख्येने पर्यटक येतात.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

फेरो बेटावरील हिरवेगार मैदान, सुंदर किनारे आणि रुचकर खाद्यपदार्थांनी  बेटावर आलेल्या पर्यटकांचे स्वागत केले जाते. येथील निसर्गरम्य दृश्ये कोणालाही आकर्षित करू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत