अखेर ‘त्या’ गव्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यात वनविभागाला यश
पुणे बातमी

अखेर ‘त्या’ गव्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यात वनविभागाला यश

पुणे : कोथरूड भागात आज पुन्हा आढळून आलेल्या रानगव्याला अखेर एचईएमआरएल कंपनीच्या पाठीमागे असलेल्या जंगलात घालवून देण्यात यश वनविभागाला यश आले. या गव्याला पकडण्याएवजी त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्याच निर्णय वन विभाग घेतला होता. त्यासाठी जंगलात जाणारा रस्ता वगळून इतर सर्व बाजूंनी बॅरीकेडींग करण्यात आलं होतं. त्यानुसार आज वनविभाग आणि पोलिसाच्या प्रयत्नाने या रानगव्याला पुन्हा जगलात सोडण्यात प्रशासणाला यश आले आहे.

गल्ली ते ग्लोबल सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी ई-चावडीच्या फेसबुक पेजला लाइक करा

पुणे शहराला लागुन असलेल्या बावधन परिसरात आधीपासूनच अनेक गवे असल्याची माहिती स्थानिकांनी दिली होती. तसेच, त्यामुळे यावेळी गव्याला पकडण्याएवजी त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाठवून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या गव्याला पकडण्याएवजी त्याच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवण्यासाठी जंगलात जाणारा रस्ता वगळून इतर सर्व बाजूंनी बॅरीकेडींग करण्यात आलं. त्यामुळे त्या गव्याला पुन्हा आपल्या अधिवासात जाता आले.

पुण्यात आज सकाळी कोथरूडमध्ये रानगव्याचे दर्शन झाले. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर बावधन येथे हा गवा आढळून आला आहे. डोंगर आणि जंगल भाग जवळच असून तेथून हा गवा आल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, याआधी ९ डिसेंबरला पुण्यात गवा दिसला होता. जंगलातला गवा ९ डिसेंबर २०२० या दिवशी थेट पुण्याच्या कोथरूड भागात रस्त्यावर आला. त्यानंतर गव्याच्या मागे लागलेला जमाव, गव्याचे पुण्याच्या रस्त्यावरून वेडेवाकडे धावणे, त्याला सुखरूप मूळ जागी पोहोचवण्याच्या दृष्टीने सारे प्रयत्न, रेस्क्यू ऑपरेशन आणि सरतेशेवटी पकडल्यावर गव्याचा झालेला दु:खद मृत्यू असा सगळा घटनाक्रम घडला होता.